मिडास इन्स्टिट्यूट चा श्रीगणेशा

मिडास इन्स्टिट्यूट चा श्रीगणेशा

आज दिनांक २२ ऑगस्ट २०२० रोजी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर आजच्या तरुणाईला कालसुसंगत आणि प्रगत बनवण्याचे ध्येय घेतलेल्या मिडास इन्स्टिट्यूट चा श्रीगणेशा करण्यात आला. या वेबसाईट मार्फत आजच्या बदलत्या जगातील स्पर्धेशी टिकण्यासाठीचे कोर्सेस देण्यात येणार आहेत. ज्याचा फायदा तरुणाईला होणार आहे. सध्या या साईट वर डिजिटल ४.० हे स्पेशलायझेशन लाँच करण्यात आले असून पहिल्या ३ कोर्सेस साठी नाव नोंदणी सुरु झालेली आहे. लवकरच या स्पेशलायजेशन मधील इतर कोर्स लाँच होणार असून इतरही अनेक विषयावरील कोर्सेस सुरु होत आहेत.

मराठी भाषेतून असणारे कोर्सेस, लाईव्ह लेक्चर्स व इंटरॅक्शन व त्या त्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीकडून मार्गदर्शन ही या इन्स्टिट्यूट ची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. लाईफ स्किल्स व सॉफ्ट स्किल्स यामध्ये मराठी भाषेत विशेष मार्गदर्शन उपलब्ध नव्हते. ही कमी मिडास भरून काढेल असा विश्वास वाटतो. या इन्स्टिट्यूट चे संस्थापक साहिल देव व विनायक पाचलग यांनी जास्तीत जास्त लोकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे

1 Comment

  • Hi, this is a comment.
    To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
    Commenter avatars come from Gravatar.

    A WordPress Commenter Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *