आजूबाजूचा काळ हा सतत बदलत आहे. तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव, जागतिकीकरण यामुळे सतत शिकत राहणे व स्वतः ला अपडेट करत राहणे ही काळाची गरज बनलेली आहे. यामध्ये विशेषतः नवी डिजिटल कौशल्ये शिकणे, नवमाध्यमाचा पुरेपूर वापर करणे व सॉफ्ट स्किल्स या गोष्टींचा समावेश होतो. आपल्या नोकरी /व्यवसायासाठी लागणारी नवनवी कौशल्ये शिकण्यासाठी वेळ काढणे ही आता काळाची गरज आहे. हीच गरज पूर्ण करण्यासाठी मिडास इन्स्टिट्यूट ची स्थापना करण्यात आलेली आहे.

मिडास इन्स्टिट्यूट वर प्रत्येक व्यकीला कालसुसंगत आणि प्रगत बनवण्यासाठी विविध कोर्सेस उपलब्ध असतील. विशेष म्हणजे हे सर्व कोर्सेस शक्यतोवर मराठी भाषेतून असतील व त्या त्या क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील दिग्गज लोक हे कोर्स शिकवतील. सध्या स्पर्धा परिक्षा, टेक्निकल स्किल्स यासाठी हजारो कोर्सेस इंटरनेट वर उपल्बध आहेत. मात्र लाईफ स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स यासाठीचे कोर्स उपलबध नाहीत. त्यामुळे मिडास वरती प्राधान्याने लाईफ स्किल्स व सॉफ्ट स्किल्स वरील कोर्सेस असतील. त्यामुळे कोणत्याही वयोगटातील , कोणत्याही व्यवसायातील आणि कोणतीही पार्श्वभूमी असलेले सर्व लोक हे कोर्स घेऊ शकतील.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचता यावे यासाठी हे कोर्सेस ऑनलाईन असतील. अर्थात, जगभरात चालू असणाऱ्या मुकस (MOOCS) चा ते एक भाग असतील. मात्र, भारतीय तरुणाला अजूनही सेल्फ लर्निंग किंवा फक्त व्हिडीओ बघून शिकायची पुरेशी सवय नाही. विशेषतः सॉफ्ट स्किल्स किंवा लाईव्ह स्किल्स हे व्हिडीओ पाहून पुरेसे समजणे शक्य नाही. त्यामुळे हे कोर्स हायब्रीड पद्धतीने घेतले जातील अर्थात ठरलेल्या वेळी झूम सारख्या अँप वरती त्या विषयाची फॅकल्टी लाईव्ह असेल व ती थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधेल

हे सर्व कोर्सेस साधारणतः २ते ३ तासांचे असतील व ते शनिवार / रविवार अर्थात विकेंड ला असतील. जेणेकरून आपल्या कोणत्याही कामाला अडथळा न होता आपण या कोर्स मध्ये सहभागी होऊ शकता. याशिवाय विविध कोर्स पूर्ण केल्यांनतर आपल्याला स्पेशलायझेशन पूर्ण झाल्याचे वेगळे सर्टिफिकेट मिळेल. याचाच अर्थ असा की आपण महिन्याभरात २४ तास देऊन आम्ही आपल्यासाठी डिझाईन केलेले स्पेशलायझेशन पूर्ण करू शकता किंवा आपल्याला ज्या गोष्टी शिकाव्या वाटतात त्याच फक्त शिकू शकता.

येणाऱ्या कालावधीमध्ये समाजातील विविध घटकांसाठी उदा. छोटे उद्योजक, दुकानदार , राजकीय व समाजकार्य क्षेत्रातील व्यक्ती, कलाकार यांच्यासाठीचे सुद्धा वेगवेगळे कोर्स घेऊन येत आहोत. कालसुसंगत व प्रगत समाज बनवण्यासाठी आम्ही सदैव कार्यरत राहू.. आपल्याला कोणते कोर्स हवे आहेत व काय शिकायला आवडेल याची माहिती तुम्ही आम्हाला संपर्क साधून देऊ शकता.

In this rapidly changing world equipped with technology and increasing globalization, it has become a need of the hour to keep learning and updating oneself. This includes learning new digital skills, making full use of new media and soft skills. It is necessary to learn the new skills in your spare time to improve your performance at the job. The Midas Institute has been established to meet this need.

A variety of courses aimed at improving an individual and keep everyone up-to-date will be available at the Midas Institute. What is special is that all these courses will be available in Marathi language and taught by experts/reputed people in their respective field. There are currently thousands of courses available on the internet for competitive exams and technical skills. However, courses for life skills and soft skills are not available. Thus, courses on life and soft Skills will be given priority on the Midas platform. So people of any age, any profession and with any background can take these course.

To ensure its reach across the Maharashtra these courses will be available online. They will be a part of the ongoing MOOCS around the world. However, Indian youth is not accustomed to self-learning by just watching videos, and especially soft skills or life skills are difficult to understand over online medium. Therefore, these courses will be conducted in a hybrid manner. Concerned faculty will conduct Zoom meetings periodically and ensure dialogue with students.

All these courses will be held over the weekend (i.e. Saturday / Sunday) for a period of 2/3 hours. So that you can participate in this course without any hindrance to your work. In addition, after completing various courses, you will get a separate certificate of completion. You can complete the specialization over a month by spending around 24 hours cumulatively, and add skills as per your convenience.

We are also bringing different courses for small entrepreneurs, shopkeepers, political and social activists and artists in the coming months. We will always work to keep the society up-to-date and on a progressive path. You can contact us to know various courses on our platform.