डिजिटल ४. ० हे नव्या जगात आणि डिजिटल युगात टिकण्यासाठी जे शिकले पाहिजे अशा कोर्स चे स्पेशलायझेशन आहे. यामध्ये एकूण ८ कोर्स आहेत. या कोर्सबद्दल माहिती घेण्याआधी आपण आधी डिजिटल ४. ० म्हणजे काय ते आपण समजून घेऊ.
भारताचा विचार केला असता भारतात गेल्या १० वर्षात डिजिटल च्या ४ क्रांती झाल्या असे आम्ही मानतो
१. ज्यावेळी भारतात स्वस्तात स्मार्टफोन उपलब्ध झाले व अँड्रॉइड टेक्नॉलॉजी सामान्य माणसाच्या आवाक्यात आली . (२०११-१२)
२. रिलायन्स जिओ : २०१७ साली रिलायंस जिओ आले आणि त्यांनी अत्यंत स्वस्त किमतीत डेटा उपलब्ध करून दिला, त्यामुळे भारतातल्या बहुतांश वर्गाला (जवळपास ५० कोटी हुन अधिक) इंटरनेट शी जोडता आले. यातून अँप्स, विविध सुविधा इत्यादीचे एक नवे विश्व तयार झाले.
३. निश्चलनीकरण : डिमॉनिटायझेशन मुळे डिजिटल पेमेंट्स व इतर अँप च्या वापराना गती आली. भारतीय भाषांमध्ये मोबाईल फोन उपल्बध झाले
४. कोरोना : कोरोनामुळे अचानक रोबोटिक्स , ऑनलाईन एज्युकेशन, ए आय याना गती आली आहे, जे बदल व्हायला १० वर्षे लागली असती ते बदल अवघ्या काही दिवसात झाले आहेत
या बद्दलच्या ४ लाटा म्हणजे “डिजिटल ४.०”. या डिजिटल ४ मुळे व्यवसाय, नोकरी या सगळ्याचे स्वरूप बदलणार आहे. आणि येणाऱ्या १० वर्षात होणाऱ्या या बदलांना सामोरे जाता यावे यासाठी आम्ही हे विशेष स्पेशलायझेशन सुरु केले आहे. आपण यातील आपल्याला जे हवे ते कोर्स घेऊ शकता किंवा पूर्ण ८ कोर्स घेऊ शकता. यामध्ये खालील कोर्स चा समावेश होतो


आपल्याला जर का पूर्ण स्पेशलायझेशन घ्यायचे असेल तर आपण विक्रम : 8805029845 या क्रमांकांवर कॉल करू शकता